जिल्हाधिकाऱयांना निवेदन :
प्रतिनिधी/ बेळगाव
नदाफ विकास निगमची तातडीने स्थापना करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य नदाफ उर्फ पिंजार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नदाफ समाज अत्यंत मागासलेला आहे. या समाजाचा विकास झालाच नाही. तेव्हा त्यांना सरकारी योजना उपलब्ध करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
नदाफ समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा. त्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. या समाजातील विद्यार्थ्यांना आजपर्यंत कोणत्याच प्रकारचा लाभ झाला नाही. याची दखल सरकारने घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. विकास निगम स्थापन केल्यानंतर त्या माध्यमातून सरकारने आर्थिक मदत केल्यास नक्कीच या समाजाचा विकास होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी अध्यक्ष अब्दुलरजाक नदाफ, सेपेटरी बी. बी. नदाफ, एम. बी. नदाफ, ऍड. आप्पालाल नदाफ, ऍड. रेहमान नदाफ, रसुल नदाफ, रेहमतुल्ला शेख, एम. ए. नदाफ यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते.









