प्रतिनिधी / म्हापसा
काणका साईमंदिराजवळ मुस्लीमवाडय़ावर एका इमारतीच्या बाजूला चारा खात असलेली गाय तोल जाऊन ती खाली कोसळली. सदर घटना बुधवारी रात्री घडली असता ती गाय जबर जखमी होऊन इमारतीच्या खाली कोसळली. घटनेची माहिती म्हापसाच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांना दिली असता त्यांच्या पुढाकाराने पालिका कर्मचाऱयांनी त्या गाईला जीवदान देत अखेर गुरांच्या डॉक्टरांकडे पाठविण्यात आले.









