रामकृष्ण कॉलनीत गटराचे काम चांगले होत आहे
जिल्हा परिषद चौक ते जरंडेश्वर नाका रस्त्याच्या कामांमध्ये दिल्या सुचना
प्रतिनिधी / सातारा
सदरबाजार परिसरात सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी आज नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केली. त्यामध्ये रामकृष्ण कॉलनीतील गटरचे काम उत्कृष्ट दर्जाचे होत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद चौक ते जरंडेश्वर नाका या रस्त्याच्या कामात ज्यांची अतिक्रमणे येत आहेत ते काढण्यात यावीत, अशा सुचना नगराध्यक्षा माधवी कदम यांनी बांधकाम विभागाचे अभियंता भाऊसाहेब पाटील यांना दिल्या. अतिक्रमण विभागाचे पथक लगेच हजर झाले. परंतु अतिक्रमण हटवण्यासाठी उद्या बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, बांधकाम सभापती मिलिंद काकडे, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, सविता फाळके, निशांत पाटील, रजनी जेधे, अभियंता भाऊसाहेब पाटील, प्रदीप साबळे यांनी केली. रामकृष्ण कॉलनीतील गटाराच्या कामाची माहिती अभियंता प्रदीप साबळे यांच्याकडून घेवून आणखी चांगल्या प्रकारचे काम झाले पाहिजे, अशा सुचना देत नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, येथील कॉलनीतील नागरिकांच्या मागणीनुसार हे काम करण्यात येत आहे. गटरचे काम झाल्यामुळे परिसरात स्वच्छता राहणार आहे, असे सांगितले. पुढे त्यांनी जिल्हा परिषद चौक ते जरंडेश्वर नाका या दरम्यानच्या रस्त्याची कामाची पाहणी केली. संरक्षक भिंतीच्या कामाची पाहणी करतेवेळी भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीतील काही घर भाडयाने दिल्याची बाब निदर्शनास आली. त्यावेळी अभियंता भाऊसाहेब पाटील यांना त्या झोपडय़ा रिकाम्या करुन काढून घ्या, असे आदेश देण्यात आले. त्याकरता उद्या बैठक घेवून संबंधितांना सुचना द्या, असे सांगितले. यावेळी रस्त्याची मोजणी केली असता 18 मीटरचा रस्ता एका झोपडीच्या दारापर्यंत येत असल्याने संबंधित मालकाच्या निदर्शनास आणून दिले.
झोपडी भाडय़ाने दिल्याचा प्रकार उघडकीस
झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी सातारा नगरपालिकेने घरकुल बांधले आहे. त्याच घरकुलातील लाभार्थ्यांनी त्यांची जुनी झोपडी भाडय़ाने दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ती जागा बागे करता आरक्षित आहे. यांना अगोदर उठवा मग बागेच बघा, अशी मागणीही यावेळी त्यांच्याकडे करण्यात आली.
अतिक्रमण विभाग तात्काळ पोहचला
बांधकाम अभियंता भाऊसाहेब पाटील यांना निशांत पाटील यांनी सुचना देताच पाटील यांनी अतिक्रमण विभागाचे निरीक्षक प्रशांत निकम हे लगेच ताफा घेवून तात्काळ पोहचले. परंतु त्यांनी आम्हाला घरे रिकामी करुन द्या, जागा मोकळी करुन द्या, आम्ही झोपडया दाखवा, आम्ही लगेच काढतो, अशी विनंती केली.









