बेळगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्र. 10 मधून निवडून आलेल्या म. ए. समितीच्या नवनिर्वाचित नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांनी तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
वैशाली भातकांडे यांनी कै. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी सई युवराज हट्टीकर, मनोहर सांबरेकर, बाबाजी हट्टीकर, महादेव जाधव, ईश्वर नाईक, गजानन काकतकर, युवराज मलकाचे, विजय होनगेकर, सुनिता होनगेकर आदी उपस्थित होते.









