प्रतिनिधी / सातारा
सातारा विकास आघाडीचे नगरसेवक श्रीकांत आंबेकर हे दि.३० ऑगस्ट रोजी आपल्या गणेशमुर्ती विक्रीचा व्यवसाय उरकून पेण, पुणे येथे व्यापाऱ्यांना पैसे देण्याकरीता २ दिवस गेले. दि.१ सप्टेंबर पासून पुणे येथेच ७ दिवस थंडीतापाने आजारी पडले. दि. ८ सप्टेंबर पासून ते दिनांक १८ सप्टेंबरपर्यंत आंबेकर यांना पुणे येथे भारती हॉस्पिटल तसेच रत्ना मेमोरियल हॉस्पिटल येथे उपचार घ्यावे लागले. अशा परिस्थितीत पुणे येथे बेड शिल्लक नसताना तात्काळ खा. उदयनराजे भोसले यांनी कृषीमंत्री विश्वजीत कदम यांच्याशी संपर्क साधुन आंबेकर यांना तातडीने अॅडमीट करून उपचार करण्यास सांगितले.
त्यानुसार आंबेकर यांच्यावर ११ दिवस उपचार होवून ते बरे झाले असुन पुणे येथेच मुक्कामी असुन ८ दिवस घरी उपचार घेत आहेत. लवकरच सातारला येणार आहेत. या काळात साताऱ्यात तसेच आपल्या वॉर्डमध्येसुद्धा काही नागरीक कोरोनामुळे मृत्यु पावले. याबद्दल त्यांनी दुखः व्यक्त केले असून सर्वांच्या आशिर्वादाने आपण बरे होवून येत असून पुन्हा आपल्या वॉर्डमध्ये तसेच शहरामध्ये कामकाज सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Previous Articleपुणे विभागातील 2 लाख 90 हजार 59 रुग्ण कोरोनामुक्त!
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.