ऑनलाईन टीम / गुरुग्राम :
घनदाट जंगलात नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असणाऱ्या कोब्रा कमांडो पथकामध्ये CRPF च्या 34 महिला कमांडोजचा समावेश करण्यात आला आहे.

कोब्रा कमांडो पथकाची नियुक्ती नक्षली हिंसाचारग्रस्त भागातच केली जाते. जंगलात लष्करी मोहिमा राबविण्याचे काम हे पथक करते. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या या पथकाला तीन महिने कठोर भरतीपूर्व प्रशिक्षणाला सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर या पथकाची नेमणूक छत्तीसगडमधील सुकमा, दंतेवाडा आणि विजापूर या सारख्या भागात करण्यात येईल, असे crpf अधिकाऱ्यांनी सांगितले.









