खानापूर : नंदगड गावच्या बसस्टँडजवळ असलेल्या गटारीच्या स्वच्छतेकडे ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने गटारीतील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या मारुती मंदिरासमोरच सांडपाणी येत असल्याने मंदिराचे पावित्र्यही अडचणीत येत आहे. याच ठिकाणी बाहेरुन येणाऱया बसही थांबत असतात. पण बस वळताना देखील या सांडपाण्यामुळे गैरसोय होत आहे. केवळ 40 ते 50 फूट लांबीच्या गटारी स्वच्छ केल्यास सांडपाणी रस्त्यावर न थांबता पुढे गटारीनेच वाहून जाते. पण त्याकडे ग्राम पंचायतीचे कसे काय दुर्लक्ष होत आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राम पंचायतीच्या पंचायत विकास अधिकाऱयांनी याकडे त्वरित लक्ष घालून गटारीत साचलेली घाण बाजूला करुन ते पाणी रस्त्यावर येणार नाही यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी केली जात आहे.
Previous Articleनिपाणी बसस्थानक परिसरातील 5 दुकाने फोडली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









