प्रतिनिधी/कोल्हापूर
येथील राजर्षी शाहू स्टेडियमवर रविवारी झालेल्या शासकीय ध्वजारोहण सोहळय़ात देशभक्तीवर गीतांवरील नृत्य, लेझीमची प्रात्यक्षिके चिमुकल्यांनी सादर केली त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते 40 हून अधिक जणांना गौरवण्यात आले. विविध प्रश्नांवर चित्ररथातून जनजागृती करण्यात आली.
परेड कमांडर प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधिक्षक सुनील कुमार यांनी संचलनाचे नेतृत्व केले. राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक मधुकर चौगुले, रविंद्र नुल्ले यांचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नक्षलग्रस्त भागात विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपाधिक्षक गणेश बिरादर, पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, राहुल वाघमारे, रविकांत गुच्चे, प्रितमकुमार पुजारी, सोमनाथ कुडवे, रोहन पाटील, किशोर खाडे, विक्रांत चव्हाण, विवेकानंद राळेभात, अभिजित भोसले, प्रमोद मगर, भागवत मुळीक, अजित पाटील यांना विशेष पदक प्रदान करण्यात आले.
डॉ. केदार साळुंखे, ओंकार नवलीहाळकर, डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कुल, साईराज पांडे, माणगाव ग्रामपंचायत, शिवाजी पाटील, विनय जाधव, सुनील कोनवाडकर, आभा देशपांडे, कमलाकर कराळे, सोनल सावंत, वैष्णवी सुतार, उद्योजक संजय माळी, तानाजी पाटील, तानाजी सावर्डेकर, मैथिली शिंदे, शेजल कांबळे, खेलो इंडिया युथ गेम्समधील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
महापालिकेच्या लक्ष्मीबाई जरग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समुह नृत्य सादर केले. वडणगे येथील शिवाजी विद्यामंदिरातील चिमुकल्यांनी लेझीमची प्रात्यक्षिके सादर केली. शिवाजी विद्यापीठ आणि महिला, बालविकास विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ पथनाटय़ सादर केले. रंकाळा येथील संजीवन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. दोन समुहगीतेही विद्यार्थ्यांनी सादर केली.
संचलनात सशस्त्र पोलीस दल, महिला सशस्त्र पोलीस दल, पुरूष होमगार्ड, महिला होमगार्ड, वनरक्षक पथक, एनसीसी महिला, पुरूष पथक, अग्निशमन दल, स्काऊट, गाईड मुलामुलींची पथके, आरएसपी मुले, मुलींचे पथक, एनसीसी वायुसेना विद्यार्थी पथक, आपत्ती व्यवस्थापन महिला, पुरूष, व्हाईट आर्मी महिला, पुरूष पथक, सहय़ाद्री कॅडट कोअर मुले, मुली, पोलीस बॅंड पथक, दंगल प्रतिबंधक पथक, सीसीटीव्ही सर्वालियस व्हॅन, दहशतवाद विरोध्ही पथक, फोरेन्सिक व्हॅन, तंटामुक्त अभियान, दंगल नियंत्रण पथक सहभागी झाले होते. चित्ररथात आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापन, वन, सामाजिक वनीकरण विभाग, मनपा शिक्षण विभागाचा सजीव देखावा, महिला, बालविकास विभागाचे बेटी बचाओ, पढाओ अभियान, जिल्हा प्रशासनाचे राष्ट्रीय मतदार जागृती, अग्निशमन दलाचे रोबोटीक, वन विभागाचा वणवे नियंत्रण आदींचा समावेश होता. चित्ररथांनाही उपस्थितांनी टाळयांच्या गजरात दाद दिली.