क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी लीग क्रिकेट स्पर्धेत सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्सचा अष्टपैलू ध्रुव देसाईच्या कामगिरीची दखल घेऊन अंतिम सामन्यावेळी गियरची सायकलचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
16 वर्षाखालील बीपीसी क्रिकेट स्पर्धेत ध्रुव देसाईने चमकदार कामगिरी केली असून त्याने एमसीसीसी संघाविरूद्ध 62 धावांची नाबाद खेळी केली होती. याशिवाय साईराज हुबळी टायगर्सविरुद्ध 40, अलोन स्पोर्ट्सविरुद्ध 16 व इतर संघाविरुद्ध 25 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत त्याने 8 बळी टिपले तर क्षेत्ररक्षणात 5 झेल व 4 धावचीत केले होते. अंतिम सामन्यात त्याने नाबाद 50 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याच्या या कामगिरीवर खूष होऊन ज्ये÷ शरीरसौ÷वपटू प्रणय शेट्टी यांनी आपले वडील रत्नाकर शेट्टी यांच्या स्मरणार्थ ध्रुवला गियर सायकल बक्षीस देऊन गौरविले. यावेळी विक्रम देसाई, नागेश देसाई, परशराम पाटील, नासिर सनदी, जयसिंह राजपूत आदी उपस्थित होते. सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्सचे प्रमुख प्रशिक्षक प्रशांत लायंदर यांचे संघाला मार्गदर्शन लाभले होते.









