रांची
मागील काही कालावधीपासून गुडघेदुखीमुळे त्रस्त असलेल्या महेंद्रसिंग धोनीने रांचीतील एका छोटय़ाशा खेडय़ात वैद्य बंधन सिंग खरवर यांच्याकडून आयुर्वेदिक उपचार घेतले आणि वैद्य बंधन यांनी अन्य पेशंट्सप्रमाणेच धोनीकडूनही फक्त 40 रुपये फी घेतली. वैद्य बंधन रांचीपासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या कटिंग्केला येथे मागील 28 वर्षांपासून एका झाडाखाली रुग्णांवर उपचार करत आले आहेत. यादरम्यान काही मुलींनी धोनीसमवेत छायाचित्रेही घेतली.









