प्रतिनिधी / इस्लामपूर
मैत्री व स्नेहातून मिळालेल्या भेट वस्तुचा आनंद अनोखा असतो. भेट वस्तू कोणती आहे, त्यापेक्षा त्यामध्ये जिव्हाळा कितपत आहे, हे महत्वाचे असते. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे पुत्र राजवर्धन यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांचे पुत्र, वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँगसचे अध्यक्ष संग्रामसिंह यांना चक्क कॅप्टनकुल महेंद्रसिंग धोनी यांनी क्रिकेट खेळात वापरलेली बॅट त्यांच्या सहीसह भेट दिली. या भेटीने दोन्ही घराण्याचे तीन पिढयातील स्नेहबंध वृद्धिंगत झाले आहेत.
सन २०१९ च्या वर्ल्डकप क्रिकेट सामने पाहण्यासाठी राजवर्धन पाटील हे इंग्लंडला गेले होते. त्यावेळी त्यांनी धोनी याची भेट घेतली. दरम्यान धोनीने त्यांना भारतीय क्रिकेटची कॅप भेट रुपाने दिली होती. ती कॅप त्यांनी संग्रामसिंह पाटील यांना भेट म्हणून दिली होती. अलिकडेच राजवर्धन यांनी चेन्नईमध्ये महिंद्रसिंग धोनी याची भेट घेतली. दरम्यान धोनीने अनेक गोलंदाजांची ज्या बॅटने धुलाई केली होती, ती बॅट धोनीने राजवर्धन यांना भेट म्हणून दिली.
दरम्यान, राजवर्धन यांनी त्या बॅटवर संग्रामसिंह यांच्या नावाचा उल्लेख करुन धोनीच्या सहीसह घेतली. तीच बॅट राजवर्धन पाटील यांनी संग्रामसिंह यांना भेट दिली. यावेळी संग्रामसिंह म्हणाले, ही भेट माझ्यासाठी हृदयस्पर्शी आहे. राजवर्धन व आमच्या घराचे तीन पिढयांचे संबंध आहेत. त्यामुळे ही भेट माझ्यासाठी आयुष्यभर अविस्मरणीय राहिल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








