- बुधवारी 1,254 नवे कोरोना रुग्ण; 06 मृत्यू
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत दररोज सरासरी 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. मागील 24 तासात दिल्लीत 1,254 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. ही या वर्षातील आता पर्यंतची उच्चांकी संख्या आहे. यापूर्वी 18 डिसेंबरला 1418 नागरिकांना संसर्ग झाला होता. त्यानंतर 96 दिवसांनी सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारी नुसार, बुधवारी 769 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 51 हजार 227 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 6 लाख 35 हजार 364 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,973 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू दराचे प्रमाण 1.69 % इतके आहे. सद्य स्थितीत 4,890 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 40 लाख 56 हजार 463 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 52,224 आरटीपीसीआर टेस्ट आणि 30,107 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 4.63 % आहे. तर 976 झोन आणि 360 कंट्रोल रूम आहेत.









