ऑनलाईन टीम / नागपूर :
नागपूरमध्ये मागील काही दिवस रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच आज दिवसभरात आज दिवसभरात तर 7,999 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 82 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, आज 6,264 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 66 हजार 417 वर पोहोचली आहे. त्यातील 2,84, 566 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
- 75 हजार पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु
सद्य स्थितीत नागपूरमध्ये 75,002 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 6,849 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे शहरात भीतीचे सावट निर्माण झाले आहे.