ऑनलाईन टीम / नागपूर :
नागपूरमध्ये संसर्ग वाढीचा आलेख दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. आज दिवसभरात 5,514 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 73 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 59 हजार 735 वर पोहोचली आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 3,277 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2 लाख 09 हजार 061 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
- 5,577 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी
सद्य स्थितीत नागपूरमध्ये 45,097 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 5,577 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.