ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने फैलावत आहे. मागील 24 तासात 1,578 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 50 हजार 712 वर पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 808 आणि काश्मीर मधील 770 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 15 हजार 169 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 6,608 आणि काश्मीरमधील 6,231 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 34 हजार 689 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 7574 रुग्ण जम्मूतील तर 27,115 जण काश्मीरमधील आहेत.

तर आतापर्यंत 854 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 137 जण तर काश्मीरमधील 717 जणांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत 5 लाख 09 हजार 482 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 42 हजार 577 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 15 हजार 169 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.









