ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 281 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 22 हजार 269 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 239 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 22,269 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2430 पोलीस अधिकारी आणि 19,839 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 18 हजार 711 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1990 पोलीस अधिकारी आणि 16,721 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
- कोरोनामुळे आतापर्यंत 239 पोलिसांचा मृत्यू
सद्यस्थितीत राज्यात 3319 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 416 पोलीस अधिकारी आणि 2903 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 239 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 24 पोलीस ऑफिसर आणि 215 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.








