प्रतिनिधी /बेळगाव
चन्नम्मानगर मुख्य रस्त्यावर काँग्रेस रस्त्यावरून उजवीकडे वळून पुढे डावीकडे वळल्यावर उजव्या बाजुला एक वाळवी लागलेला तसेच पूर्णपणे सुकलेला वृक्ष कधी कोसळेल, अशा परिस्थितीमध्ये आहे. या मार्गावरून दिवस रात्री दुचाकी, चारचाकी, शहर बससेवा, अवजड वाहने अशी वर्दळ सुरू असते. तसेच पादचाऱयांची संख्या अधिक आहे. अशावेळी हा मोठा निर्जीव वृक्ष कोसळण्याची दाट शक्मयता नाकारता येत नाही. तसेच हा वृक्ष कोसळल्यास पुढे काही अघटित दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या दुसऱया बाजुला उच्चदाबाची वीजवाहिनी लोंबकळत आहेत. अशा परिस्थितीत हा वृक्ष कधी कोसळेल याचा नेम नाही. त्यामुळे एखादी जीवितहानी होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. संबंधित अधिकाऱयांनी विशेष लक्ष दिल्यास पुढील होणारा संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी होत आहे.









