ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 189 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 22 हजार 818 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 245 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 22,818 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2495 पोलीस अधिकारी आणि 20,323 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 19 हजार 385 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 2085 पोलीस अधिकारी आणि 17,300 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
- मृतांची संख्या 245
सद्यस्थितीत राज्यात 3188 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 385 पोलीस अधिकारी आणि 2803 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 245 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 25 पोलीस ऑफिसर आणि 220 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.








