लवकरच होणार लिलाव
प्रतिनिधी / पणजी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे पणजी महानगरपालिकेने अनेक कामे हाती घेतले आहे. लॉकडाऊनमुळे पणजीत असणारी येरादारी सध्या प्रचंड प्रमाणात कमी होती याचाच फायदा घेत मनपाने पणजी शहरात असलेल्या अनेक बेवारीस वाहन जप्त केली आहे. जी अनेक वर्षांपासून शहरात धूळ खात होती.
ही वाहने जप्त करताना मनपातर्फे 6 महिन्याची नोटीस वृत्तपत्रातर्फे वाहन मालकांना बजाविली होती. दि. 16 मार्च 2020 रोजी या 6 महिन्याचा कालावधी संपल्यानंतरच या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहीती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
जवळपास 260 वाहने पणजी शहरातील अनेक भागात धूळ खात होती. यातील सुमारे 50 वाहने नोटीस दिलेल्या कालावधीत त्या वाहनांचा मालकांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. तर आतापर्यंत सुमारे 120 दुचाकी व 90 चारचाकी वाहने आमच्या ताब्यात घेतली आहे. असे मडकईकर यांनी पुढे सांगितले.
सध्या ताब्यात घेतलेले सर्व वाहने कांपाल येथील परेड मैदानावर ठेवण्यात आले आहे. लवकरच या वाहनांच्या लिलाव संदर्भात नोटीस काढण्यात येणार आहे. व नंतर या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया सध्या सुरु आहे, लवकरच नोटीस देखील काढू, तोपर्यंत ही सर्व वाहने कापांल येथील परेड मैदानावरच ठेवण्यात येणार आहे. असे मडकईकर यांनी अधिक माहीती देताना सांगितले.
पणजी पोलिस स्टेशन येथील परीसरात अनेक वाहने सध्या जागा अडवून आहे. परंतु या भागातील जास्तशी वाहने ही अपघाती वाहने आहे व त्यांचे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे या वाहनांवर सध्या आम्ही कारवाई करु शकत नाही. परंतु येणाऱया काळात गोवा पोलिसांना विश्वासात घेऊन यावर काही उपाय योजना करण्यात येईल. असे महापौर उयद मडकईकर यांनी सांगितले.









