डिचोली / प्रतिनिधी
मोन्सूनच्या पावसाने काल मंगळवारी (दि. 16 जून) सकाळीपासून बराच जोर धरताना दुपारपर्यंत धुंवादार वृष्टी केली. डिचोली तालुक्मयाला पावसाने अक्षरशः झोडपून काढताना तालुक्मयातील अनेक खालच्या भागांमध्ये दुपारी पाणी साचल्याने पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. साखळीतील वाळवंटी नदीतील पाण्याची पातळी झपाटय़ाने वाढल्याने बाजारातील नाल्यात भरणारे पाणी पंपींगद्वारे बाहेर फेकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अनेक ठिकाणी किरकोळ झाडांच्या पडझडीं®³ाा घटना घडल्या.
जून महिन्याच्या प्रारंभीलाच सलग तीन दिवस धुंवादारपणे पाऊस झाल्यानंतर पवासाचा तसा जोर कमी झाला होता. तरीही अनेक भागांना पाऊस झोडपून काढत होता. डिचोली तालुक्मयातील अनेक ठिकाणी पावसाची बरसात सुरूच होती. त्यामुळे झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या होत्या. काल मंगळवारी मात्र पावसाने अचानकपणे जोर धरताना सकाळीपासून दुपारपर्यंत जोरदार बरसात केली. त्यामुळे डिचोली नदीला व साखळीतील वाळवंटीला मोठय़ा प्रमाणात पाणी वाढते पाण्याची पातळी वाढल्याने सुरक्षिततेचे उपाय म्हणून साखळी वाळवंटी किनारी असलेले पंप सुरू करून बाजारातील नाल्यात भरणारे पाणी बाहेर फेकण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. साखळीतील वाळवंटी नदीची पातळी एकाण दिवसाच्या पावसात 3.2 इतकी वाढली होती.
जोरदार पावसामुळे डिचोली बाजार परिसराबरोबरच आसपासच्या परिसरातही रस्त्यांवर पाणी भरून राहिले. त्यामुळे लोकांचे हाल झाले. विर्डी ते साखळी या रस्त्यावरील म्हावळंगतड येथे रस्त्यावर गुढघाभर पाणी भरल्याने वाहने अडकून पडली किहींंनी धाडस करत भरलेल्या पाण्यातूनच आपली वाहने पुढे हाकली. तसेच साखळीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाजवळील गटरातील पाणी गटरातून पुढे न जाता ते रस्त्यावरच बाहेर येत असल्याने हा संपूर्ण परिसर जलमय दाला होता. मोठय़ा वेगाने पाणी वाहत असल्याने त्याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. साखळीतील पालिका मैदान जलमय झाले होते.
डिचोली बाजारात सध्या गटराचे काम सुरू असल्याने त्याठिकाणी टाकण्यात आलेल्या मातीमुळे या भागात पाणी साचले होते. तसेच बंदरवाडा परिसरातील रस्त्यावर पाणी साचले होते. गटरव्यवस्था अनेक ठिकाणी नियोजनबद्ध नसल्याने पावसाळय़ात पाणी साचण्याचे प्रकार हल्लीच्या काळात अनेक ठिकाणी घडत आहे. मात्र त्याचा नाहक मनस्ताप लोकांना सहन करावा लागत आहे.
जोरदार व सलगपणे पावसाचा मारा चालूच राहिल्याने अनेक मुख्य रस्त्यांवर पाणी साचले होते. तसेच अनेक ठिकाणी रसत्यांवर माती व दगड आल्याचे दिसून आले. डिचोली ते साखळी या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी माती रस्त्यावर आली होती. विठ्ठलापूर साखळी येथील रस्त्यावर
गतीरोधकाकडे मोठय़ा प्रमाणात माती साचली आहे. या मातीमुळे दुचाकीचालकांना अपघात घडण्याची भीती आहे. तसेच कुळण येथील माजी मुख्यमंत्री तथा आमदार प्रतापसिंह राणे यांच्या घरासमोरील रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे माती रसत्यावर आली आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटरांची साफसफाई सार्वजनिक बांधकाम खात्याकडून योग्य प्रकारे होत नसल्याने दरवषी गटरातील पाण्यासह माती रस्त्यावर येत असते. या प्रकारावर कोणाचेही लक्ष नाही. या पावसामुळे काही ठिकाणी झाडे रस्त्यांवर किंवा घरांवर पडण्याच्या किरकोळ घटना घडल्या. त्याठिकाणी धाव घेऊन डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्य केले. सध्या डिचोली व साखळीतील नद्यांना पाणी बऱयाच प्रमाणात वाढले आहे. पावसाची बरसात रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. त्यामुळे जर सदर पाऊस तसाच चालूच राहिला तर डिचोली व साखळी परिसरात पुरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्मयता आहे.