ऑनलाईन टीम / मुंबई :
धारावीतील शाहू नगरमध्ये मुबारक हॉटेलसमोर असलेल्या एका घरात दुपारी पावणे एकच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात 14 जण जखमी झाले असून, त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोन जण 70 टक्के भाजल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन फायर इंजिन, एक जंबो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.









