धामोड/ वार्ताहर
धामोड ( ता. राधानगरी ) येथील किरण विष्णू पाटील व बाबुराव आबा पाटील यांचा तीन एकरातील ऊस जळून खाक झाला . महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडली.
गुरुवारी दुपारी दोन वाजता शार्टसर्किट होऊन ऊसाला आग लागली . धुराचे प्रचंड लोट सुरू झाल्याने गावातील लोकांनी जळणाऱ्या उसाकडे धाव घेतली. आगीचा वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. यात शेतकरी किरण विष्णू पाटील व बाबुराव पाटील यांचा तीन एकर क्षेत्रातील ऊस जळाला. या दोन्ही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ऊस जळाला आहे. या परिसरातील शिवारातून महावितरणचे विजेचे खांब टाकण्यात आले आहेत. मात्र, महावितरणकडून योग्य देखभाल केली जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी तारांमध्ये अंतर कमी असून घर्षण झाल्याने शॉर्टसर्किट होऊन ऊस जळण्याच्या हा प्रकार घडला आहे. या ओढवलेल्या संकटांमुळे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
महावितरण कंपनीने येथील जिर्ण झालेल्या तारा तत्काळ दुरुस्त कराव्यात. कमी उंचीवर असलेल्या वीज तारांच्यामुळे शॉर्टसर्किट होण्याचे प्रमाण वाढले आहे .तसेच साखर कारखान्यानी वाढीव टोळ्या पाठवून लवकरात लवकर शेतकऱ्यांचा जळीत ऊस तोडून न्यावा. ऊस जळीत क्षेत्राचे पंचनामे लवकर करून या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









