वार्ताहर / धामणे
धामणे विभाग शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दीपावलीनिमित्त आयोजित मोटारसायकलसोबत म्हैस पळविण्याची जंगी शर्यत उत्साही वातावरणात पार पडली.
रविवार दि. 22 रोजी येथील बसवाण गल्लीत मोटारसायकल सोबत म्हैस पळविण्याच्या शर्यतीचे उद्घाटन गजानन शंकर कोळूचे (बसवण कुडची) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तत्पूर्वी दीपप्रज्वलन मारुती रेमाणाचे यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन संजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन पुंडलिक अकणोजी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण सायनेकर, ओमकार पाटील, पिटर डिसोझा, बाळू केरवाडकर, विजय बाळेकुंद्री, परशराम कुगजी, ओमकार पाटील, यल्लाप्पा रेमाणाचे, सुनील चौगुले आदी उपस्थित होते.
या शर्यतीत मोठय़ा गटातील कलमेश्वर प्रसन्न (सुहास) हिंडलगा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. दुर्वा कोकितकर (हिंडलगा) द्वितीय तर कारेश बाजरे, बेळगाव यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. मोठय़ा गटासाठी एकूण 11 आकर्षक बक्षिसे होती. लहान गटात किशोर भातकांडे यांनी प्रथम, उमेश कसोटी-कॅम्प बेळगाव यांनी दुसरा क्रमांक तर प्रितम पाटील (शास्त्रीनगर) यांनी तिसरा क्रमांक मिळविला. लहान गटासाठी एकूण 11 आकर्षक बक्षिसे
होती.
शर्यत उत्साही वातावरणात पार पाडण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे धामणे विभाग प्रमुख महेश पाटील, श्रीपती पाटील, प्रकाश रेमाणाचे, भरत बेळगावकर, गावडू पाटील, राहुल बाळेकुंद्री, अजित कुगजी, महेश येळ्ळूरकर आदी धारकऱयांनी परिश्रम घेतले.









