शहापूर पोलिसांची कारवाई, 12 हजार 610 रुपये जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
विष्णू गल्ली, धामणे रोड, वडगाव येथे मटका घेणाऱया तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जवळून 12 हजार 610 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. शहापूर पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली आहे.
नवीन अशोक बुचडे (वय 26, रा. धामणे रोड, साईनगर), मोहीन शकील शिडल्याळी (वय 21, रा. संभाजी रोड, खासबाग-शहापूर), सर्फराज शब्बीरअहम्मद शेख (वय 35, रा. नवी गल्ली, शहापूर) अशी अटक करण्यात आलेल्या तीघा जणांची नावे असून सर्फराज हा बुकी आहे.
धामणे रोडवर मटका घेण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून मटकाबुकींना अटक केली. त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायदा 78 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.