सांगरुळ / प्रतिनिधी
दिर्घकाळ रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध झाला असून ३४१ कोटी रूपयांची निविदा शुक्रवार दिनांक १४ मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आ.पी.एन.पाटील – सडोलीकर यांनी दिली.
राधानगरी तालुक्यातील राई येथील ३.८५ टी.एम.सी.क्षमतेच्या धामणी प्रकल्पामुळे गगनबावडा, पन्हाळा व राधानगरी तालुक्यातील जवळपास १५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच या भागातील जनतेला दरवर्षी भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येणार आहे, अशी माहिती आ.पाटील यांनी दिली.
गतवर्षी या प्रकल्पासाठी निविदा निघाली होती. मात्र कोरोना प्रकोपामुळे पुढील प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यामुळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटून धामणी प्रकल्पाचे काम थांबले ते सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांनी या प्रकल्पाचे काम निधी अभावी रखडले असून अजित पवार यांना भेटून निधीची मागणी करण्यास सांगितले. त्यानुसार आपण स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे पवार यांनी या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये निधीची तरतुद करून दिली.
आगामी काळात धामणी प्रकल्पाच्या पुर्ततेसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. शुक्रवार दिनांक १४ मे रोजी ३१४ कोटी रूपयांची निविदा प्रसिद्ध केली जाणार असून यातून ऊर्वरित मातीकाम, प्रवेश व पुच्छ कालव्या सह सांडवा तसेच सिंचन तथा विद्युत विमोचकाचे ऊर्वरीत काम, अप्रोच रस्ता व पुलांचे बांधकाम केले जाणार आहे, असे आ.पी.एन.पाटील यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









