वार्ताहर / म्हासुर्ली
धामणी खोऱ्यातील चौके – मानबेट परिसरातील कंदलगाव (ता राधानगरी) येथे मुंबई येथून माहेरी आलेल्या महिलेस पतीसह कोरोना लागण झाल्याचा अहवाल आला आहे.परिणामी एक महिन्यानंतर पुन्हा चौके परिसरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.
धामणी धरण परिसरात असणारे कंदलगाव हे सदर महिलेचे माहेर असून सासर रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. सध्या ती पतीसह कामधंद्यानिमित्त मुंबई येथे स्थायीक आहे.तर तीन दिवसांपूर्वी संबंधीत पॉझिटिव्ह पती – पत्नी रुग्णांचा प्रवास मुंबई – आजरा असा प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका खासगी बसमधून झाला होता.या बस मधील काही प्रवासी कोरोनाग्रस्त असल्यामुळे त्यांच्या संपर्कातूनच संबंधित दाम्पत्याला कोरोना संसर्ग झाला असल्याचे समजते.सुमारे महिन्या पूर्वी याच परिसरातील कामानिमित्त मुंबईस असणाऱ्या सुमारे नऊ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे संपूर्ण धामणी खोरा भीतीची छायेत होता. त्यानंतर पुन्हा दोन रुग्ण सापडल्याने कोरोनाची छाया गडद झाली आहे.
मात्र तेथीथ दक्षता कमिटीने सर्व प्रकारची दक्षता घेत सदर दाम्पत्याला संस्थात्मक अलगीकरण केंद्रात दाखल करुन त्यांच्या घशातील स्वॅब तपासणीस पाठविला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी राधानगरी कोविड उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात केले आहे. या अगोदर धामणी खोऱ्यात मुंबई वरून आलेल्या चौदा लोकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते सर्वजण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








