वाढीसोबत 375.72 लाख टनावर : सरकारकडून खरीप पिकांची यादी सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील सात-आठ महिन्यांच्या कालावधीत कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणाऱया क्षेत्रांमध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा सर्वाधिक राहिला असल्याची माहिती आहे. याचाच एक भाग म्हणून चालू खरीप व्यापारी सत्रात आतापर्यंत धान्य खरेदी 21 टक्क्यांनी वधारुन 375.72 लाख टनाच्या घरात पोहोचली असल्याची माहिती आहे. सदरच्या धान्य खरेदीचे मूल्य हे तब्बल 70,937.38 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून समोर आली आहे.
सरकारकडून नुकतेच खरीप व्यापारी सत्र (केएमएस)2020-21 मध्ये कमीतकमी विक्री मूल्यावर (एमएसपी) खरीप 2020-21 मधील पिकांची यादी सादर करण्यात आली आहे. खरीपाचा हंगाम हा ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. यामध्ये खरीप 2020-21 मध्ये करण्यात आलेल्या खरेदीचा तपशील दिलेला आहे.
भारतीय खाद्य निगम आणि राज्य सरकार यांच्या एजन्सीने 13 डिसेंबरपर्यंत 375.72 लाख टन धान्यांची खरेदी केली आहे. हा आकडा एक वर्षापूर्वी 310.4 लाख टन होता.









