प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात गेली 3 दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली. पण धरणक्षेत्रातील पाणी थांबवल्याने पूरस्थिती बऱयाच प्रमाणात नियंत्रणात आली आहे. जर धरणातील पाणी सोडले असते तर सद्यस्थितीत पंचगंगेची पाणी पातळी 50 फुटांपर्यत पोहोचली असती अन् गतवर्षीसारखी गंभीर स्थिती निर्माण झाली असती. जिल्हय़ात 12 ऑगस्टपासून 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे येणारे पाणी धरणात राहण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांना निर्देश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. उषा कुंभार उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्हय़ात अतिवृष्टी झाली, नद्यांना पूर आला. पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनाने सतर्कता म्हणून सुमारे 4 हजार कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. पण शुक्रवारी पावसाने उघडीप दिली, तर राधानगरी धरणातून होणारा विसर्गही कमी झाल्याने 24 तासांत पाणीपातळी दोन फुटांनी वाढली. पण सायंकाळी 45 फुटांवरून पाणी पातळी अर्ध्या फुटाने कमी झाल्याने पूरस्थिती बऱयाच प्रमाणात नियंत्रणात आली आहे. सध्या जो पूर आला आहे तो धरणक्षेत्राबाहेरील पाण्यामुळे आला आहे. या दरम्यान, धरणांतील पाणी सोडले असते तर गतवर्षीप्रमाणे महापुराची गंभीर स्थिती निर्माण झाली असती, असे त्यांनी सांगितले.
पाऊस सुरू असताना राधानगरी धरणातील विसर्ग थांबवण्यात आला. धरणातून पाणी सोडले असते तर अन्य छोटी धरणेही भरली असती अन् विसर्ग मोठय़ा प्रमाणात झाल्याने महापूराचा धोका होता. जिल्हय़ात पूरस्थिती पुर्णपणे नियंत्रणात आहे. धरणातील पाणी नियंत्रित केल्याने हे शक्य झाले आहे. सद्यस्थितीत राधानगरीच्या दोन दरवाजांतून 1 हजार पेक्षा कमी क्युसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, 12 ऑगस्टपासून 3 दिवस जिल्हय़ात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे संभाव्य पुराचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांची बैठक घेतली. या बैठकीत संभाव्य अतिवृष्टीत येणारे पाणी धरणात राहण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिल्याची माहितीही जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








