प्रतिनिधी / शिरोळ
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना आज शनिवार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. संशयित आरोपीने ही विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यास उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की धरणगुत्ती ता शिरोळ येथील जयप्रकाश हाऊसिंग सोसायटी मध्ये भाड्याने राहत असलेला चेतन मनोहर घोरपडे वरची 32 याने आपली पत्नी अर्चना चेतन घोरपडे वय वर्ष 25 गेल्या काही महिन्यापासून चारित्र्याचा संशय घेता होता. दोघेही औद्योगिक वसाहतीमध्ये वेगळ्या कंपनीत काम करीत होते. अर्चना हिला घरी घेऊन आला व त्याने ब्लेडने हातावरच्या नसा गळ्यावर वार करून खून केला व स्वतः त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यास उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची फिर्याद मयत अर्चना हिची आई वासंती प्रकाश पुजारी राहणार विजयसिंग नगर शिरोळ यांनी पोलिसात दिली आहे अर्चना तिच्या आठ वर्षापर्वी जयसिंगपूर येथे राहणारा चेतन मनोहर घोरपडे याचे सोबत प्रेम विवाह झाला होता अर्चना हिचे सासुबरोबर पटत नसल्याने दोघेही एक वर्षापासून जयप्रकाश हौसिंग सोसायटी येथे श्रीकांत जाधव यांच्या घरी भाड्याने राहत होते गेल्या काही महिन्यापासून संशयित आरोपी चैतन्याने पत्नी अर्चना हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता.
आज सकाळी नेहमीप्रमाणे अर्चना ही एमआयडीसीमध्ये कामावर गेली होती बारा वाजण्याच्या सुमारास त्याने अर्चनाला घरी आणून ब्लेडने हातावरच्या नसावर गळ्यावर वार करून केबलने गळा आवळून खून केला व स्वतः विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
संशयित आरोपी हा स्वतः जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असुुन जयसिंगपूर व शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. सदर घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ डी डी सानप पो हे कॉ सागर पाटील हे करीत आहेत.