वरपित्याने मिळालेले 11 लाख रुपये केले परत
राजस्थानच्या बुंदी जिल्हय़ातील निवृत्त प्राचार्य बृजमोहन मीणा यांनी टोंक जिल्हय़ातील एका गावातील युवतीशी स्वतःच्या मुलाचा विवाह निश्चित केला आहे. मंगळवारी या जोडप्याचा साखरपुडा पार पडला आहे. याचे विधी सुरू असतानाच वधूपित्याने नोटांच्या बंडलांनी भरलेली थाळी आणून ठेवली. हे पाहताच बृजमोहन मीणा यांनी हे रुपये आम्हाला नकोत, केवळ मुलगी हवी असल्याचे म्हणत हुंडय़ादाखल मिळत असलेले 11 लाख रुपये परत केले आहेत. लोकांनी परंपरेच्या पालनाचा आग्रह धरल्याने मीणा यांनी केवळ 101 रुपये स्वीकारले आहेत.
मुलींचा सन्मान वाढविला
स्वतःच्या होऊ घातलेल्या सासऱयाच्या निर्णयावर वधू आरती अत्यंत आनंदी आहे. हुंडय़ापोटी मिळत असलेली रक्कम परत करून त्यांनी समाजाला संदेश तिला आहे. यातून मुलींचा सन्मान वाढणार असल्याचे आरतीने म्हटले आहे. टोंक, बूंदी, सवाई माधोपूर जिल्हय़ात अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. राजस्थानच्या या भागात अद्याप हुंडय़ाचा प्रकार प्रचलित असल्याचे दिसून आले आहे.









