प्रतिनिधी / इस्लामपूर
धनगर समाज एस.टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्यावतीने राज्यभर मोठा लढा उभारणार असल्याचे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी सांगितले. सरकार कोणतेही असो, समाजाच्या दृष्टीने धनगर आरक्षण लागू होणे ही आज काळाची गरज बनली आहे. राज्य व केंद्र सरकार आरक्षण प्रश्नांवर वेळ काढू पणाची भूमिका घेत आहे असे मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीने २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२१ या पाच दिवसात संपूर्ण राज्यभर नजीकच्या ७ ते ८ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांना एकत्रित करून राज्यव्यापी विभागीय व्यापक बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. सातारा, मुंबई, जळगाव, शेगांव, अमरावती, नांदेड, बीड, अहमदनगर या जिल्ह्यांच्या ठिकाणी जवळपासच्या ७ ते ८ जिल्ह्यातील धनगर समाजाच्या प्रमुख पदाधिकारी यांना एकत्रित करून धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नांसह अन्य निरनिराळ्या प्रश्नांवर चर्चा व विचार विनिमय करण्यात आला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








