रत्नागिरी / प्रतिनिधी
कोरोनामुळे गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 11 जणांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा दोनशे पार गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 209 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात मागील चोवीस तासात 69 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 6 हजार 605 वर पोचला आहे.
Previous Articleडॉक्टरांचे आंदोलन मागे, कोरोना रुग्णांची नोंद सुरु
Next Article चेन स्नॅचिंग प्रकरणी दोघा जणांना अटक









