प्रतिनिधी / लातूर
लातूर जिल्हा कोरोना मुक्त झाला असताना उदगीर येथील ७० वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॅाझिटीव्ह आला आहे.ही महिला कोणाच्या संपर्कात आली याचा तपास सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार ही महिला गुजरात मधुन आली असल्याची माहिती आहे. ती कोणाच्या संपर्कात आली याचा तपास चालू आहे. तिच्यावर उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जिल्हा प्रशासात खबबळ उडाली असून, जिल्ह्यातील सिमा तपासणीत त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. जि्ल्हा माहिती अधिकारी यांनी उदगीर येथे एक महिला पॅाझिटीव्ह असल्याचा स्पष्ट केल आहे.








