प्रतिनिधी/बार्शी
बार्शी शहर आणि तालुक्यांमध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत चालला असून आज सकाळी आलेल्या अहवालानुसार पाच कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आता एकूण बार्शीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 44 झाली आहे.
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार बार्शी शहरातील पाटील प्लॉट या विभागांमध्ये एक रुग्ण सापडला असून तर बारंगुळे प्लॉट या ठिकाणी एक रुग्ण सापडला आहे तसेच आदर्श नगर नागणे प्लॉट येथे एक रुग्ण सापडला असून एक रुग्ण सीना दारफळ येथील असून तो बार्शी मध्ये नोकरीस आहे असे बार्शी शहरात चार कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर एक रुग्ण साकत पिंपरी या गावातील असल्याचे माहिती तालुका आरोग्य अधिकारी जोगदंड यांनी दिली. आता आज सकाळपर्यंत एकूण घेतलेल्या नमुन्यांपैकी 20 नमुन्यांची तपासणी अहवाल यायचे बाकी आहेत अहवाल आज संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे.
Previous Articleसंध्याकाळी पेट्रोल – डिझेल विकत घ्या, सकाळी विका आणि आत्मनिर्भर व्हा: आव्हाडांचा टोला
Next Article सातारा जिल्ह्याला पुन्हा झटका, 28 अहवाल पॉझिटिव्ह









