भोपाळ / ऑनलाईन टीम
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून जवळपास ४०० किमी दूर अंतरावर असलेल्या आदिवासी बहुल अलिराजपूर जिल्ह्यातील एका गावात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. गावकऱ्यांनी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबतच दोरीने बांधून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या नातलगांनी तिला आरोपीसोबत चालायला भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांची धिंड काढताना हा जमाव ‘भारत माता की जय’च्या घोषणाही देत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका वृत्त वाहिनेने दिलेल्या वृत्तनुसार, या धक्कादायक प्रकाराची माहिती पोलिसांना मिळतEच पोलिसांनी घटानस्थळी धाव घेतली. या जमावापासून पीडितेची सुटका करण्यात आली. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिला गुन्हा बलात्काराचा आरोप असलेल्या २१ वर्षीय व्यक्तीविरोधात, तर दुसरा गुन्हा पीडितेच्या नातेवाईकांविरोधात आणि गावकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे. पीडितेला आणि आरोपीला मारहाण करुन त्यांची धिंड काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिलीपसिंह बिल्वाल यांनी दिली.
रविवारी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये पीडिता आणि आरोपीला एका दोरीने बांधून त्यांची धिंड काढताना दिसत आहे. त्यांच्या बाजूचे काही लोक ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत आहेत.
या घटनेवर अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी देखील संताप व्यक्त करत हे अमानवीय कृत्य असल्याचे म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









