ऑनलाईन टिम / पुणे :
पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला असून ५२ वर्षीय पुरूषाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर रूग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार होता. विशेष म्हणजे या व्यक्तीने कोणाताही परदेश दौरा केला नव्हता. तसेच कोणत्याही परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात ही व्यक्ती नव्हती.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या २१५ वर पोहोचली आहे. त्यातील ९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर २५ जणांना डिस्चार्ज दिला आहे. सध्या केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण असून महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्णांचा बळी गेला आहे.