ऑनलाईन टीम / हरियाणा :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. त्यातच हरियाणा मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. हरियाणातील गुडगाव मधील एका 54 वर्षाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीला कोरोनाची लागण झाली हे कळताच आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळ्याला फास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. पण घटनास्थळी त्यांना कोणतीही सुसाईट सापडली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतबीर सिंह असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो आपल्या पत्नी व मुलांसह राहत होता. त्याची पत्नी गेल्या काही दिवसापासून आजारी असल्याने तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिची कोरोनाची टेस्ट करण्यात आली. या टेस्टचे रिपोर्ट मध्ये तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पतीने आत्महत्या केली.
दरम्यान, पोलिसांनी सतबीरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे.









