ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. तीन दिवसाच्या बाळासह मातेला कोरोना ची लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 मार्च रोजी या महिलेला चेंबूरमधील रुग्णालयात प्रसुती करता दाखल करण्यात आले होते. डिलिव्हरी झाल्यानंतर महिला व बाळाला कोरोना ची लागण झाल्याचे उघड झाले.
दरम्यान, महिलेच्या पतीने माझ्या पत्नीला कोरोना रुग्णांच्या शेजारील बेड दिला होता त्यामुळे पत्नी आणि मुलाला कोरोनाची लागण झाली आहे, असा आरोप रुग्णालयावर केला आहे. सध्या पत्नी आणि मुलाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.









