ऑनलाईन टीम / मुंबई :
नवी मुंबईत महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पनवेलमधील दुंद्रे गावातील ही घटना आहे. महिलेला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्यानंतर पाच आरोपींनी तिला गळफास लावला. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या पाच ही आरोपी फरार असून पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चोरीच्या आरोपावरुन हा प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी शेजारच्यांनी मृत महिलेवर मंगळसूत्र चोरीचा आरोप केला होता. त्यावरुन मोठा वादही झाला होता. त्यानंतर हे प्रकरण मिटलं होतं.
त्यानंतर आज सकाळी शेजाऱयांनी महिलेच्या घरात घुसून तिला पेटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिला गळफास लावून लटकवण्यात आलं. यात तिचा मृत्यू झाला.









