प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात २०७ नवे रुग्ण सापडले आहेत. आता आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७३६ इतकी झाली आहे. आज रत्नागिरीत सर्वाधिक ५४ रुग्ण सापडले आहेत. तर खेड ३२, गुहागर २६, चिपळूण ३०, संगमेश्वर ४७, लांजा ९, राजापूर ९ अशी रुग्णसंख्या आहे.









