प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपर्यंत कोरोनाने 28 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये इचरकंरजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजीतील जवाहरनगर येथील 45 वर्षीय पुरुष, भोने मळा येथील 72 वर्षीय वृद्ध,हनुमान नगर येथील 72 वर्षीय वृद्ध, भाटले मळ्यातील 67 वर्ष वृद्ध, जवाहर नगर येथील 68 वर्षीय वृद्ध, शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील ६० वर्षे वृद्ध, हातकणंगले तालुक्यातील चंदुर येथील 56 वर्षे पुरुष, शहापूर येथील 43 वर्षीय पुरुष, शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथील 62 वर्षीय वृद्ध, अब्दुल लाट येथील ४५ वर्षे पुरुष आणि 65 वर्षीय महिला, शहापूर येथील 55 वर्षीय महिला आणि यड्राव येथील 70 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला.
कोल्हापूर शहरातील कदमवाडी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये शिरोळरय तालुक्यातील यड्राव येथील 70 वर्षे वृद्धेचा मृत्यू झाला. शास्त्री नगर येथील हॉस्पिटलमध्ये करवीर तालुक्यातील निगवे येथील ६९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. राजारामपुरीतील हॉस्पिटलमध्येे करवीर तालुक्यातील पिरवाडी येथील 64 वर्षे वृद्धाचा मृत्यू झाला. रंकाळा येथील हॉस्पिटलमध्ये जरगनगर येथील 67 वर्षे वृद्धाचा मृत्यू झाला. राजारामपुरीमध्ये रंकाळ वेशीतील 70 वर्षे वृद्धाचा मृत्यू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये फुलेवाडी रिंग रोड येथील 61 वर्षे वृद्धाचा मृत्यू झाला, आजरा येथील 74 वर्षीय वृद्ध आणि कागल येथील 53 वर्षे पुरुषाचा मृत्यू झाला. शहरातील देवकर पानंद येथील 74 वर्षीय महिला, नागाळा पार्क येथील 76 वर्षीय वृद्ध, राधानगरी तालुक्यातील धामोड येथील 52 वर्षे पुरुष, निपाणी बेळगाव येथील 53 वर्षीय महिला, जयसिंगपूर येथील 68 वर्षीय पुरुष आणि इचलकरंजी येथील 71 वर्षे वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला गेल्या चोवीस तासातील या 28 कोरोना मृत्यूमुळे आजपर्यंतची कोरोना बळीची संख्या 524 झाली आहे.
यामध्ये ग्रामीण भागातील 184 नगरपालिका भागातील 154 कोल्हापूर शहरातील 137 आणि अन्य 19 अमृत बळींचा समावेश आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पॉझिटिव्ह आलेल्या 509 रूग्णांमध्ये आजरा 15, भुदरगड १७, चंदगड ५, गडहिंग्लज ४, हातकणंगले 88, कागल 16, करवीर 61, पन्हाळा 5, राधानगरी 14, शाहूवाडी १७, शिरोळ 27, नगरपालिका क्षेत्र 69, कोल्हापूर शहर 153 आणि अन्य 19 यांचा समावेश आहे. आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण 17 हजार 942 आहेत. शनिवारी दिवसभरात 288 जणांना मिळाला. त्यामुळे कोरोना मुक्ताची आजपर्यंतची संख्या 9864 झाली आहे. सध्या कोराेनाचे एकूण 7554 रुग्ण उपचार घेत आहेत शनिवारी सायंकाळपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या rt-pcr लॅबच्या 1,115 रिपोर्ट आले त्यापैकी 842 निगेटिव तर 267 पॉझिटिव आहेत अंतिजन टेस्टचे 519 रिपोर्ट आले. त्यापैकी 405 निगेटिव आहेत.
चोवीस तासांतील पॉझिटिव्ह रुग्ण 509
आजपर्यंतचे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 17942
आजपर्यंतचे कोरोना मुक्त रुग्ण 9864
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण 7556
एकूण कोरोना बळी 52४









