- पदमपुरा कोविड केअर सेंटरमधील घटना
ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
औरंगाबादमधून डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या पदमपुरा कोविड केअर सेंटरमध्ये एका कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात घुसून डॉक्टरला बेदम मारहाण केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टराने पीडित महिलेचा मोबाइल नंबर मिळून दररोज तिला फोन करून त्रास द्यायचा असा आरोपही करण्यात आला आहे. बुधवारी सुट्टी देण्याच्या नावाखाली या महिलेला केबिनमध्ये बोलावले. त्यानंतर एकांतात या डॉक्टरने तरूणीकडे शरीरसुखाची मागणी केली.
या धक्कादायक प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मनपा आयुक्त पांडे यांनी दिले आहेत. तसेच या घटनेनंतर डॉक्टरला रुग्णालयातून हटवण्यात आले आहेत.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी 37 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 51, 287 वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी 47564 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आतापर्यंत 1278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सद्य स्थितीत 2,445 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.








