वृत्तसंस्था / कराची
पहिल्या क्रिकेट कसोटीत गुरूवारी खेळाच्या तिसऱया दिवशीअखेर दक्षिण आफ्रिकेने दुसऱया डावात 4 बाद 187 धावा जमवित पाकवर 29 धावांची आघाडी मिळविली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मार्करम आणि व्हान डर डय़ुसेन यांनी समयोचित अर्धशतके झळकविली. तत्पूर्वी पाकचा पहिला डाव 378 धावांत आटोपला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 220 धावांवर आटोपल्यानंतर पाकने 8 बाद 308 या धावसंख्येवरून तिसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे दोन गडी 70 धावांची भर घालत तंबूत परतले. दक्षिण आफ्रिकेतर्फे रबाडाने 70 धावांत 3 गडी बाद केले. रबाडाने कसोटी क्रिकेटमध्ये आपला 200 बळींचा टप्पा गाठला. असा पराक्रम करणारा रबाडा हा दक्षिण आफ्रिकेचा चौथा गोलंदाज आहे. पाकच्या हसन अलीचा 21 धावांवर त्रिफळा उडवून रबाडाने 200 वा बळी नोंदविला.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका प. डाव 220, पाक प. डाव 119.2 षटकांत सर्वबाद 378 (फवाद आलम 109, फहीम अश्रफ 64, अझहर अली 51. रबाडा 3-70, नॉर्त्जे 2-105, एन्गिडी 2-57, केशव महाराज 3-90), दक्षिण आफ्रिका दु. डाव 75 षटकांत 4 बाद 187 (मार्करम 74, एल्गार 29, डय़ुसेन 64, डु प्लेसिस 10, यासीर 3-53, नौमन 1-27).









