महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला कृष्ण कथा सांगताना पुढे म्हणतात –
यदुकुमार समस्त जाण । करूं न शकती नृगोद्धरण । कृष्णाकारणें करिती कथन । परम उत्सुक होत्साते । नमूनि भगवत्पदारविन्दा । म्हणती स्वामी श्रीमुकुन्दा । उपवनीं क्रीडतां कुमारवृंदा । परमाश्चर्य देखियेलें । अंधकूपीं सरठदेही । पर्वतप्राय प्राणी पाहीं । क्षुधे तृषेनें पीडतां कांहीं । विश्रान्ति नाहीं अणुमात्री । तया देखोनि यदुकुमार । उद्धरणार्थ श्रमले फार । करूं न शकोंच तदुद्धार । मग सत्वर कथू आलों । यदुकुमारांना त्या कुपात पाहिलेला तो प्राणी म्हणजे पर्वताच्या आकाराचा एक सरडा होता. त्याला पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यांना त्याची दया येऊन ते त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु ती मुले जेव्हा त्या विहिरीत पडलेल्या सरडय़ाला कातडी दोराने बांधूनही बाहेर काढू शकले नाहीत, तेव्हा कुतूहलाने जाऊन त्यांनी ती गोष्ट श्रीकृष्णांना सांगितली. हें ऐकूनि जनार्दन । द्रवला स्वभक्तकरुणेंकरून । ज्ञानदृष्टी नृगाचरण । पाहे विवरून विश्वदृक् rं । त्रिकालीनज्ञानद्रष्टा । जाणोनि नृगाच्या कर्मानिष्टा । छेदावया शापकष्टा । उपवनीं पैठा स्वयें आला rं । तेथे जाऊनि कूपापासीं । पंकजाक्ष ज्ञानैकराशि । षड्गुणैश्वर्यसंपन्नतेसीं । विश्वभावन विश्वात्मा rं । विलोकूनियां कृपान्तरिं । कृपापाङ्गें सदय हरि । लीलेकरूनि वामकरिं । रज्जु धरूनि आकषी rं । दयापाङ्गें अवलोकिलें । तेणेंचि ऊर्ध्व आकर्षिलें । करस्पर्शाचें निमित्त केलें । मानुषीं लौकिकपरिहारीं । लोहचुंबक लोह आकषी । रज्जुहस्तादि नाहीं त्यासी । कृष्ण केवळ चैतन्यराशि । तेथ कायसी ग्रहणक्रिया rं । चुंबक लोहाचें जेंवि ग्रहण । तेंवि नृगाचें उद्धरण । स्पर्श लोहा करी सुवर्ण । तें लक्षण शुक वर्णी । भगवंताला त्या प्राण्याची दया आली. जगाचे जीवनदाते कमलनयन भगवान श्रीकृष्ण त्या विहिरीपाशी आले. त्या सरडय़ाला पाहून आपल्या डाव्या हाताने सहज त्यांनी त्याला बाहेर काढले.
सरठदेही जो तो नृग । कृपापाङ्गें कमलारंग ।
कडे काढूनि तद्देह ।शंतमहस्तें कुरवाळी rं ।
देव वर्णिती उत्तम कीर्ति । यालागीं उत्तमश्लोक म्हणती । पद्मकरें तो नृगाप्रति । स्पर्शे चित्तीं द्रवोनियां rं ।
अमृतहस्तें सरठतनु । स्पर्शतांचि जनार्दनु । स्पर्श लोहा करी सुवर्ण । तेंवि काञ्चनमय झाला rं । लोह काळिमा आणि जडता । सांडी तेंवि कृकलासता । टाकूनि दिव्यतनूतें धरिता । झाला तत्वता नृगरावो rं । सम्यक्तप्त जेंवि सुवर्ण । तैसा सुंदर तनूचा वर्ण । स्वर्गवासियांमाजि मान्य । वसनाभरणीं देदीप्य rं । मनुष्यांमाजी उत्तमयोनी । श्रीमंत यशःश्रीसुकृतखाणी । अंत्यादि पामर नीचयोनी । मानव म्हणोनि सम न कीजे rं । तैसे पिशाच गुह्यक भूत । त्याही देवयोनिच निश्चित ।
तथापि शक्र ज्यां सम्मानित । ते अद्भुत स्वर्गवासी rं ।
तयां श्रे÷ांमाजी गणना । मिरवी अद्भुतां वसनाभरणां । तुरंबूनियां मंदारसुमना । माळा अवतंस शोभवी rं । एवं ऐसा दिव्यदेही । सरठतनू त्यागूनि पाहीं । हस्त स्पर्शतांचि नवाई । कृष्णें लवलाहीं प्रकटिली ।
Ad. देवदत्त परुळेकर