मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेस नेते नाना पटोले यांचा सध्या उत्तर महाराष्ट्र दौरा सुरू आहे. मात्र नाना पटोले यांना दौरा अर्धवट सोडून उद्या दिल्लीला जाव लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. नाना पटोले यांना तातडीने दिल्लीचे बोलवन झाल्याने दिल्लीला जाव लागणार आहे.
नाना पटोले आज धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे दौऱ्यावर आहेत. काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी, तसेच कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांसाठी रणनिती ठरवून उत्साह वाढविण्यासाठी ते दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यात नाना पटोले आगामी काळातील सर्वच निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावरच लढणार असल्याचे ठणकावून सांगताना दिसतात.
नाना पटोले यांनी जळगावमधील दौऱ्यात स्वबळाचा नारा दिला होता. तसेच, विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल, येत्या पावसाळी अधिवेशनात त्याची निवड होणे अपेक्षित आहे. मात्र, ही निवड होण्यासाठी सर्व आमदार सभागृहात असणे अपेक्षित असते. गेल्या अधिवेशनात अनेक आमदार कोरोना संसर्गामुळे येऊ शकले नाहीत, असे देखील सांगितले होते. त्यामुळेच, आता विधानसभा अध्यक्षांची निवड आणि आगामी निवडणुकासंदर्भात चर्चा करण्यासाठी नाना पटोले शुक्रवारी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
Previous Articleलक्ष्मी बिर्जे यांचे निधन
Next Article विरोध : बांगलादेशी मौलवीने काढला अजब फतवा!








