अचूक बातमी “तरूण भारत”ची, शुक्रवार 18 मार्च 2022, सकाळी 11.30
● जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढ घसरलेलीच
● नऊ तालुक्यात एकही नवा रूग्ण नाही
● कराडला तीन तर खंडाळ्यात एक
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख घसरलेलाच असून चाचण्यांच्या संख्येच्या तुलनेत रूग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. त्यामुळे होळीनंतर आज धुलवडीच्या रंगोत्सवाला आनंदाचे भरते आले आहे. दोन वर्षानंतर जिल्ह्याच्या अनेक भागात वेगवेगळ्या समुहांनी सकाळपासूनच रंगोत्सवाचा आनंद लुटायला सुुरूवात केली आहे. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात फक्त पाच रूग्णांची वाढ झाली असून पॉझिटिव्हीटी रेट 0.85 वर आहे.
कराड तालुक्यात 3 रूग्ण
जिल्ह्यात गत 24 तासात 586 संशयितांंनी चाचण्या करून घेतल्या आहेत. त्यापैकी केवळ पाच रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. पाचपैकी तीन रूग्ण कराड तालुक्यातील तर एक रूग्ण खंडाळा तालुक्यातील आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 0.85 वर आहे.
नकारात्मक वातावरणाची होळी
गेले दोन वर्ष कोरोनाच्या संकटाने एकही सण मोकळा श्वास घेत साजरा करता आला नाही. कोरोनाचा सातारा जिल्ह्याला मोठा फटका बसला. मात्र, आता जिल्ह्यात कोरोना शासकीय आकड्यांपुरता मर्यादीत राहिला असून अनेक तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र तरीही नियमांच्या चौकटीत राहून जिल्हावासियांनी गुरूवारी होळीचा सण उत्साहाने साजरा केला. कोरोनाचे नकारात्मक वातावरण कायमचे होळीच्या अग्नीत दहन व्हावे अशी प्राथना करण्यात आली.
शुक्रवारी
नमुने-586
बाधित-05
शुक्रवारपर्यंत
नमुने-25,64,612
बाधित-2,79,154
मृत्यू-6,681
मुक्त-2,71,725









