प्रतिनिधी / पलूस
पलूस नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व व्यावसायिकांचा आर्थिक वर्ष २०२० / २१व २०२१/२२ चा व्यवसाय कर पूर्ण माफ करावा; कोरोना महामारीच्या काळात व्यापारी वर्गाला दिलासा मिळणेबाबत छत्रपती शिवाजी महाराज पलूस तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने पलूस तहसीलदार व मुख्याधिकारी पलूस नगरपरिषद यांना देण्यात आले. कोरोना महामारीमुळे सर्व व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. व्यवसाय बंद असल्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेले आहे. काहींना व्यापार बंद करावे लागले आहेत. सर्व व्यापाऱ्यांवर जगण्याची नामुष्की ओढवलेली आहे.
पलूस नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व व्यावसायिकांचा आर्थिक वर्ष २०२० / २१व २०२१/२२ चा व्यवसाय कर पूर्ण माफ करावा. पलूस नगरपरिषदेच्या मालकीचे सर्व दुकान गाळे, सर्व खोकी यांचे आर्थिक वर्ष २०२०/२१ व २०२१/२२ दोन वर्षाचे भाडे पूर्ण माफ करावे पलूस मधील सर्व व्यवसाय सकाळी ७:०० ते दुपारी २:०० पर्यंत सुरु करण्यास परवानगी द्यावी. या मागणीसाठी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी अमर गायकवाड, सुहास माळी, रोहित पाटील, सागर सुतार, महेश सुतार, सतीश भोसले, स्वप्नील पाटील, विक्रम पोळ, गौस मुल्ला, विठ्ठल बुचडे उपस्थित होते.