प्रतिनिधी / कोल्हापूर
मत्स्त्य व्यावसायिकांकडून अतिवृष्टीमध्ये झालेल्या मासे आणि मासे उत्पादनासाठीच्या जाळ्याचे झालेल्या नुकसानीचे 26 लाख रुपये शासनाकडून मिळवून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून दोन लाखाची लाच स्विकारता कसबा बावडा येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सुर्वे यांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्यानी गुरुवारी रंगेहाथ पकडून अटक केली. प्रदिप केशव सुर्वे (रा. ब्ल्यु बेल अर्पाटमेंट, कारंडे मळा, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. ही कारवाई मत्स्य व्यवसाय कार्यालयात केली आहे, अशी माहिती कोल्हापूर लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.
पोलीस उपअधीक्षक बुधवंत म्हणाले, तक्रारदार यांचा मत्स्त्य व्यवसाय आहे. त्यांने जिह्यातील दोन तलाव ठेकेदार तत्वावर घेतले आहेत. गेल्या वर्षी जिह्यात जो महापूर आला होता. त्या महापूरात त्यांच्या तलावातील मासे व मासे उत्पादनासाठी लावलेल्या जाळया वाहुन गेल्या होत्या. त्यावेळी राज्य सरकारने पुरग्रस्तासाठी नुकसान भरपाई जाहीर केली होती. त्याप्रमाणे तक्रारदाराने ठेकेदार तत्वावर घेतलेल्या तलावाचे महसुल विभागाकडून पंचनामे करण्यात आला होता. त्यानुसार त्यांने महापूरामुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळावी. याकरीता कसबा बावडा येथील मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार सरकारकरून तक्रारदाराला माशांची नुकसान भरपाई म्हणुन, मिळालेली 26 लाख रुपये मत्स्यव्यवसाय कार्यालयाने गेल्या महिन्यात त्यांच्या बँक खात्यावर जमा केली.
पण मत्स्य जाळयांची नुकसान भरपाई सरकारकडून अद्याप मिळालेली नसल्याने, तक्रारदारने मत्स्यव्यवसाय कार्यालयाचे मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहाय्यक आयुक्त सुर्वे यांची भेट घेतली. तेव्हा सुर्वेंनी त्यांच्याकडे माझ्या कार्यालयाने पाठविलेल्या प्रस्तावामुळेच तुला 26 लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे, असे म्हणुन नुकसान भरपाई रक्कमेच्या 40 टक्के रक्कम म्हणजेच साधारण 10 लाख रूपये त्यांच्याकडे मागितले. हे पैसे नाही दिले तर उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम तुला मिळणार नाही, असे सांगितले. तेव्हा तक्रारदाराने पैसाबाबत त्यांच्याकडे विनवनी केली. परंतु त्यांनी काही न ऐकता पैसे दिले. तरच पुढील नुकसान भरपाई मिळेल, असे सांगितले. मिळवून दिलेल्या नुकसान भरपाईचे कमीत-कमी 7 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती 5 लाखांच्या लाचेची रक्कम देण्याचे निश्चीत ठरविण्यात आले. या 5 लाख रुपयांच्या लाचेचा पहिला 2 लाखांचा हफ्ता व नंतर उरलेल्या 3 लाखांचा हप्ता देण्यास सुर्वेनी सांगितले. त्यानुसार गुरुवारी दुपारी 2 लाखाचा लाचेचा हप्ता स्विकारताना सुर्वेना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्यांनी त्यांच्याच ऑफिसमध्ये रंगेहाथ पकडून अटक केली. कारवाईत याचा सहभाग नाहीत असे सांगितले. जि . कोल्हापूर यांचे कार्यालयाकडुन शासनाकडे प्रस्ताव पाठविणेत आला होता .
Previous Articleकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
Next Article एकाच दिवशी कोरोनाचे सात बळी









