कॅनडात लसीकरणाच्या तयारीला वेग
जगभरातील सर्वच देश कोरोनाची महामारी रोखण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण सुरू करू पाहत आहेत. या शर्यतीत आता कॅनडाही सामील झाला आहे. ब्रिटन आणि बहारीननंतर कॅनडाने बुधवारी दोन कोरोना लसींना मंजुरी दिली आहे. यात फायजर इंक आणि बायोएनटेक एसई कंपन्या सामील आहेत. याचबरोबर कॅनडात कोरोनाच्या लसीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. फायजर आणि बायोएनटेककडून विकसित लसीला कॅनडातही वापराची अनुमती देण्यात आली आहे. कॅनडात असलेल्या सक्षम देखरेख व्यवस्थेद्वारे या लसीसंबंधी कठोर समीक्षा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ही लस बाजारात उपलब्ध होताच कॅनडा आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अत्यंत बारकाईने या लसीवर देखरेख ठेवणार असून चिंताजनक बाब समोर आल्यास आवश्यक निर्णय घेतले जातील, असे कॅनडाच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.









