राजकीय जोडप्याना समज देवून सोडून दिले : कारवाईने इचलकरंजीच्या राजकीय वर्तुळात खळबळ
इचलकरंजी / प्रतिनिधी
शहापूर ते पंचगंगा साखर कारखाना रोडवरील हॉटेल आरव आणि लॉजिंगवर पोलिसांनी अवैध वेश्या व्यवसाय सुरु असल्याच्या कारणावरुन शुक्रवारी दुपारी छापा टाकला. या छाप्यात इचलकरंजीमधील दोन राजकीय जोडप्यासह दोन युवक आणि दोन पिडीत युवती मिळून आल्या. पोलिसांनी पिडीतेची सुटका करीत, त्या दोन्ही राजकीय जोडप्यांना समज देवून सोडून दिले, अशी माहिती सुत्रानी दिली. तर हॉटेल व्यवस्थापकास चार जणाना ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईने शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ आहे.
हॉटेल आरव ॲण्ड लॉजीगमध्ये बेकायदेशिरपणे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसाना बातमीदाराकडून मिळाली. त्यावरुन पोलिसांनी या हॉटेलवर शुक्रवारी दुपारी छापा टाकला. यावेळी पोलिसाना हॉटेलमध्ये अश्लिल चाळे करीत असलेले इचलकरंजी शहरातील दोन राजकीय जोडप्यास दोन युवक आणि दोन पिडीत युवती आढळून आल्या. पोलिसाच्या या कारवाईने ती राजकीय जोडप्याची चांगलेच हादरुन गेले. ते कारवाई करु नका म्हणून पोलिसांना गयावया करु लागली. तर पोलिसांच्या या कारवाईची माहिती समजताच त्या राजकीय जोडप्याच्या समर्थकांनी हॉटेलच्या परिसरात गर्दी केली होती. अखेर राजकीय हस्तक्षेप झाल्याने पोलिसांनी या जोडप्याना समज देवून सोडून दिले.
तर हॉटेल ॲण्ड लॉजीग व्यवस्थापकासह चौघाना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यत गुन्हा नोंद करण्याचे काम शहापुर पोलिसात सुरु होते.
Previous Articleपवार-गडकरींची पुण्यात भेट
Next Article चीनची 38 लढाऊ विमानं तैवानच्या हद्दीत घुसल्याचा दावा









